पोटच्या मुलानं जन्मदात्या आईसोबतच केलं असं काही, पोलिसांना देखील धक्काच बसला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मुलाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याचा प्रकार औरंगाबाद शहराच्या सिडको परिसरात घडला आहे. कहर म्हणजे तब्बल तीन महिन्यांपासून हा मुलगा आईवर बलात्कार करत होता. २० वर्षीय आरोपी मुलगा दारूसाठी पैसे हवेत म्हणून अनेकदा आईला मारहाण देखील करत असे.

मुलाने पीडित महिलेवर गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार केले. या कृत्याची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून तो पीडितेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि स्वत:ही आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. पीडिता सिडको परिसरात आपल्या दोन मुलांसह राहत होती. पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झालेले असून महिलेची दोनीही मुले बाहेरगावी शिकतात. तर मोठ्या मुलीचे लग्न झाले असून दुसरी एक मुलगी देखील बाहेरगावी नोकरी करते.

महिलेने चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करत आपल्या चार अपत्यांना वाढवले मात्र आरोपी असलेला सर्वात मोठा मुलगा महिलेला वारंवार दारूसाठी पैसे मागत असे शिवाय तो कोणताही कामधंदा करत नव्हता. दारूच्या आहारी गेलेल्या या नराधमाने तीन महिन्यांपासून महिलेवर अत्याचार केले.

पोलिसांनाही बसला धक्का –
भीती आणि बदनामी होईल या विचाराने पीडिता त्याचा अत्याचार सहन करीत होती. पण, मंगळवारी दुपारीही त्याने घरात एकट्या असलेल्या आईला मारहाण करीत आणि धमक्या देत अत्याचार केले. अखेर हिंमत एकवटून पीडितेने बुधवारी सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

ज्यावेळी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली त्यावेळी हा सर्व प्रकार ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला अखेर पोलिसांनी आरोपीला पकडून न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/