भूईंज : पोलीसनामा ऑनलाईन – आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि चीड आणणारी संतापजनक घटना वाई तालुक्यातील एका गावात गुरुवारी रात्री घ़डली. एका सैतान मुलानं आपल्या आईवरच बलात्कार केला. याला वडीलांनी विरोध केल्यानंतरत्यांनाही मुलाने दगडाने मारहाण केली. पोलिसांनी मुलाला अटक केल आहे. तर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी मुलाची आई वाई तालुक्यातील एका गावात राहण्यास आहे. त्याची आई आणि वडिल दोघेही लग्न कार्यक्रमासाठी गावी गेले होते. त्यानंतर त्याची आई एकटीच लग्नावरून परत आली. मुलगा घरासमोरील ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी आई घरात गेली. त्यानंतर तो तिच्या मागे मागे घरात गेला. त्यानंतर त्याने आतून कडी लावली होती. त्यानंतर त्याने आईवर जबरदस्ती केली. त्यामुळे आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारी तेथे जमा झाले. त्यांनी त्याच्या वडीलांना याची माहिती दिली. त्यानंतर ते घरी आले. त्यांनी त्याला जाब विचारले तेव्हा त्याने वडिलांना दगडाने मारून जखमी केले. त्यांनी घटनेनंतर तात्काळ भूईंज पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाच्या संतापजनक कृत्याची माहिती दिली.