लज्जास्पद ! मुलाने वृद्ध आईला मारली चापट, जमिनीवर पडताच मृत्यू; CCTV मध्ये घटना कैद (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्लीच्या द्वारका भागात एक लज्जास्पद घटना घडली आहे. येथे घरगुती वादातून एका मुलाने आपल्या आईला कानाखाली मारली, ज्यामुळे जमीनीवर पडून वृद्धेचा मृत्यू झाला.

वास्तविक, 15 मार्च रोजी दुपारी 12:30 सुमारास रणवीर नावाच्या व्यक्तीने आपली आई अवतार कौरला कौटुंबिक वादावरून चापट मारली. कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात नेले पण जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती ना कुटुंबियांंनी दिली ना रुग्णालयाने पोलिसांना दिली.

आरोपी मुलाला अटक

पोलिसांना घटनेच्या आदल्या दिवशी एक पीसीआर कॉल आला होता की, बिल्डर फ्लॅटच्या बाहेर पार्कींग वरून भांडण झाले होते. दरम्यान, नंतर सर्वकाही शांत झाले. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या पत्नी व आईशी वाद घातला आणि आईला चापट मारली. चापट मारल्यानंतर आरोपीची वृद्ध आई जमिनीवर पडली. घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला. या क्षणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी व पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच समजेल की, वृद्ध महिलेचा मृत्यू जमिनीवर पडल्यामुळेच झाला की, इतर कोणत्या कारणामुळे . सध्या पोलिसांनी बिंदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. तो बिंदापूर भागातच लपला होता.