अखेर मेहनतीचं चीज झालं ! ‘गुणवंत’ शिक्षकाचा मुलगा झाला RBI चा ‘व्यवस्थापक’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरमधून एका तरुणाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या तरुणाची निवड थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये निवड झाली आहे. देशभरातील अडीच लाख तरुणातून त्याची निवड झाली आहे. हा यशस्वी तरुण आहे अभिषेक सयाम. नागपूर जिल्ह्यातुन निवड झालेला हा एकमेव तरुण आहे. आरबीआय व्यवस्थापक पदावर त्यांची नुकतीच निवड झाली आहे. या परिक्षेत केवळ १२७ विद्यार्थी यशस्वी होऊ शकले आहेत. यात एक अभिषेक सयाम आहे.

अभिषेक यांचे वडील सुखदेव सयाम हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत तर आई गृहिणी आहे. अभिषेकला पहिल्यापासूनच अर्थशास्त्र विषयाची आवड होती. त्यांना आरबीआयमध्ये काम करायचे होते. मात्र तिथं पर्यंत पोहचायचे कसे हे त्यांना माहित नव्हते. सोमलवार निकालसमधून दहावी आणि डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयातून १२ पास केल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेतले.

कोणताही क्लास न लावता झाला आरबीआयचा व्यवस्थापक

२०१७ मध्ये मास्टर्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरबीआयच्या परिक्षेची जोमाने तयारी केली. हा अभ्यास त्यांनी कोणताही क्लास न लावता केला. त्यांनी फक्त आरबीआयच्या सिलॅबसमधून आणि जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करुन त्यांनी यश मिळवले. ऑगस्ट २०१८ मध्ये पूर्व आणि सप्टेंबर २०१८ साली मुख्य परिक्षा देऊन ते यशस्वी झाले. त्यानंतर मुलाखतीत देखील त्यांनी यश मिळवले.

महाराष्ट्रातून १९ जणांची निवड

आरबीआयच्या परिक्षेला अडीच लाख विद्यार्थी बसले होते, त्यातील २००० उमेदवारांची मुख्य परिक्षेला निवड झाली त्यानंतर फक्त ६०० उमेदवार मुलाखतीसाठी यशस्वी ठरेल. त्यात १२७ उमेदवार यशस्वी ठरले. आता २९ जुलैला अभिषेक १० आठवडे प्रशिक्षणासाठी चेन्नईला रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातून यात फक्त १९ उमेदवारांची निवड झाली.

आरोग्यविषयक वृत्त