‘इंडियन आयडॉल’ शोमधून अनु मलिकला बाहेर काढणं सांकेतिक विजय : सोना महापात्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन आयडॉलचे जज अनु मलिक यांना शोमधून बाहेर काढणं हा लैंगिक अत्याचार पीडित महिलांचा सांकेतिक विजय आहे असं बॉलिवूड सिंगर सोना महापात्रानं म्हटलं आहे. एका मुलाखतीत तिनं म्हटलं की, शोमधून अनु मलिक बाहेर पडणं ही एक चांगली बातमी आहे.

आयएएनएससोबत बोलताना सोना म्हणाली, “ही खूप चांगली बातमी आहे. सोनी टीव्हीनं हा निर्णय घ्यायला जरा उशीरच केला परंतु मी खूप खुश आहे की, अखरे त्यांना शोमधून बाहेर काढण्यात आलं. ही पूर्ण देशाची लढाई होती. अनेक अशी लोकं होती ज्यांना त्यांना(अनु मलिक) नॅशनल टेलिव्हिजनवर पाहायचं नव्हतं. कारण तो(अनु मलिक) लोकांना चुकीचा संदेश देत होता की, असं करूनही तुम्ही वाचू शकता.”

पुढे बोलताना सोना म्हणाली, “मी न्याय आणि निष्पक्षतेसाठी लढत होते. परंतु ही बातमी ऐकून मला वाटतं की, हा सर्वांचा विजय आहे माझ्या एकटीचा नाही. त्या सर्व महिलांचा ज्यांच्यासोबत त्यांनी गैरवर्तन केलं आहे. आमची लढाई अजून संपलेली नाही, सुरू झाली आहे. आम्ही गप्प बसणार नाही.”

‘या’ सिंगर्सनेही केले अनु मलिकवर आरोप-
हे प्रकरण 2018 साली सुरू झालं होतं जेव्हा सोनानं अनु यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. सोना नंतर सिंगर नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनीही अनु मलिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.

परंतु जेव्हा सोनी टीव्हीनं अनु मलिक यांना यावर्षी म्हणजे 11 व्या सीजनमध्ये जज म्हणून नियुक्त केलं तेव्हा सोना महापात्रानं संगीतकार आणि चॅनलविरोधात आपलं अभियान सुरू केलं. गेल्या काही दिवसांत या प्रकरणी लोकांनी सोनाला खूप सपोर्ट केला. लोकांनीही अनु मलिक यांनी काढण्याची मागणी केली. यानंतर गुरुवारी अनु मलिक यांना शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सोनी टीव्हीच्या जवळच्या सूत्रांनी आयएएनएसला माहिती देताना अनु मलिक यांना बाहेर काढल्याच्या बातमीवर दुजोरा दिला आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like