‘हा’ व्हिडीओ पाहून भडकली ‘सिंगर’ सोना मोहपात्रा ! म्हणाली-‘सलमाननंदेखील गर्लफ्रेंडच्या डोक्यात दारूची बाटली फोडली होती’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   टिकटॉक स्टार फैजल सिद्दीकी, सध्या वादात सापडताना दिसत आहे. त्याच्या एक टिकटॉक व्हिडीओत अॅसिड अॅटॅकला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. फैजलच्या या व्हिडीओवर आता बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिनं प्रितिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर फैजलवर टीका करताना तिनं बॉलिवूड स्टार सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोना आपल्या बिंधास्त वक्तवयांसाठी फेमस आहे.

सोना मोहपात्रानं एक ट्विट केलं आहे. सोनानं तंझिला अनीस नावाच्या एका महिलेला टॅग केलं आह. सोना म्हणते, “तुम्ही या व्यक्तीचा बचाव करत होतात. महिलांचा अपमान करणं आपल्या संस्कृतीत सामान्य बाब आहे. इथं आपण सलमान खानच्या कहाण्या ऐकत मोठे झालो आहोत. जिथं त्यानं सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडच्या डोक्यात दारूची बाटली फोडली होती. एवढं सगळं होऊनही तो देशातला मोठा स्टार आहे. आता या सर्वांना थांबवणं गरजेचं आहे.

काय आहे फैजल सिद्दीकीच्या टिकटॉक व्हिडओत ?

फैजलच्या एका व्हिडीओत असा एक डायलॉग आहे की, उसने तुझे छोड दिया जिसके लिए तूने मुझे छोडा था. यानंतर तो महिलेच्या तोंडावर एक लिक्विड फेकतो. यानंतर मुलीचा चेहराच एकदम बदलून जातो. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खूप व्हायरल झाला. अॅसिड अटॅकला प्रोत्साहन देणारा हा व्हिडीओ आहे असे आरोप होऊ लागले.