सोनई हत्याकांड प्रकरण : उच्च न्यायालयाकडून चौघांची फाशीची शिक्षा कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सोनई येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातून दलित युवकाच्या हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या पाच जणांपैकी चौघांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. सबळ पुराव्याअभावी एकाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.

रमेश विश्वनाथ दरंदले (39), प्रवीण पोपट दरंदले (19), प्रकाश विश्वनाथ दरंदले (34) (सर्व रा. गणेशवाडी, विठ्ठलवाडी, सोनई, ता. नेवासा) संदीप माधव कुरे (वय 33, रा. खरवंडी, ता. नेवासा) यांची फाशी कायम झाली, तर अशोक नवगिरे याची सुटका करण्यात आली आहे. सोनई येथील परिसरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलीचे एका दलित युवकाशी प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधाच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी दलित युवतीची अतिशय क्रूरतेने हत्या केली होती. शरीराचे तुकडे करून मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून देण्यात आला होता. अतिशय क्रूरतेने झालेल्या हत्याकांडाची राज्यभरात चर्चा झाली होती.

विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. या खटल्यात नाशिक येथील विशेष सत्र न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. शिक्षेच्या कन्फर्मेशनसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. उच्च न्यायालयाने चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवली, तर एकाची शिक्षा रद्द केली आहे.

Visit : Policenama.com

You might also like