Video : सोनाक्षी सिन्हाला ट्रोल करणारा पोलिसांकडून अटक ! व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली- ‘सावध रहा आता तुमचा नंबर !’
पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिनं एका ट्रोलरविरोधात आवाज उठवला आहे. ऑनलाईन छळ झाल्या प्रकरणी तिनं मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं ऑनलाईन छळ करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हानं मिशन जोशसह मिळून इंस्टाग्राम अकाऊंटवरून ऑनलाईन छळ करणाऱ्यांविरोधात मोहिम छेडली होती. 7 ऑगस्ट रोजी तिनं या मोहिमेला सुरुवात केली होती. जी लोकं सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत कमेंट करतात त्यांच्याविरोधात तिनं तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी यापैकीच एकाला अटक केली आहे. या आरोपीचं नाव शशिकांत जाधव आहे. या आरोपीला औरंगाबदमध्ये अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोनाक्षी सिन्हानं पोलिसांच्या या कारवाईनंतर आता मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर तिनं ऑनलाईन ट्रोल करणाऱ्यांना सावधही केलं आहे. सावध रहा नाही तर पुढचा नंबर तुमचा असेल असंही तिनं म्हटलं आहे. सोनाक्षीनं सोशलवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.