सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात प्रवेश ? अभिनेत्रीनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) चे वडिल शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha), आई पूनम सिन्हा (Poonam Sinha) आणि भाऊ लव सिन्ह (Luv Sinha) हे सर्व राजकारणात सक्रिय आहेत. सोनाक्षी अनेकदा फॅमिलीला सपोर्ट करताना दिसली आहे. परंतु खुद्द सोनाक्षी राजकारणात एन्ट्री घेऊ इच्छित आहे का? ॲक्ट्रेसनं यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना सोनाक्षीनं तिच्या रजकारणातील प्रवेशावर बोलताना सांगितलं की, माझा असा काहीच बेत नाहीये. भाऊ लवच्या राजकारणाच्या एन्ट्रीवर बोलताना ती म्हणाली, मी खूप खुश आहे की, लवनं हे पाऊल टाकलं. कारण लवकडे यासाठीची पात्रता आहे. राजकारणात काय सुरू आहे याच्याशी तो चांगल्यापैकी कनेक्टेड आहे आणि त्याला पूर्ण माहिती आहे. यावेळी बोलताना सोनाक्षीनं तिच्या न्यू ईयर प्लॅनबद्दलही सांगितलं आहे.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अजय देवगणचा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तिनं एका गुजराती महिलेची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं कलंक, खानदानी शफाखाना आणि दबंग 3 या सिनेमात काम केलं आहे.