Video : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सोनाक्षीचे रंगोली आणि कंगणावर ‘ताशेरे’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतरच बॉलिवूड मध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात वाद चालू झाला. कंगना राणावतने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूड मूवी माफिया आणि घराणेशाहीला जबाबदार ठरवलं होतं. सुशांतच्या वडिलांनी मात्र सुशांतची गर्लफ्रेंड रियाला याबद्दल दोषी ठरवलं आहे. मात्र घराणेशाहीचा वाद विकोपाला पोहचला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महेशभट्ट दिग्दर्शित सडक 2 या सिनेमाच्या ट्रेलरला मात्र मोठ्या प्रमाणात नापसंती मिळाली आहे. कंगना राणावत देखील घराणेशाहीवरून वाद घालत असते. आता या मुद्द्यावरून सोनाक्षी सिन्हाने कंगना आणि तिची बहीण रंगोलीला उत्तर दिलं आहे.

एचटी सोबत झालेल्या एका मुलाखतीत बोलताना सोनाक्षीने रंगोली आणि कंगणावर ताशेरे ओढत म्हणाली, मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे, ज्याने कोणी घराणेशाही सारख्या मुद्द्याला एवढे उचलून धरले आहे, त्याची बहिणच सगळं काम मॅनेज करत असेल’ ती पुढे म्हणाली, माझ्या वडिलांनी कधी कोणत्या प्रोड्युसरला फोन करून सांगितलं नाही की माझ्या मुलीला तुमच्या सिनेमात घ्या म्हणून.

सोनाक्षीने ट्विटर ला रामराम ठोकला
सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाउंट नुकतंच बंद केलं आहे. कारण सोनाक्षीला अनेकजण ट्रोल करत होते. शेवटी तिने कंटाळून अकाउंट बंद केलं. ती पुढे असंही म्हणाली की, ट्विटर सोडल्यापासून मला बरं वाटत आहे.

सोनाक्षी पुढे म्हणाली, एखादी व्यक्ती कोणत्या विशेष घरात जन्माला आली म्हणजे तिचा काय दोष आहे. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर एक सिरीजही चालू केली होती ज्याचं नाव होत ‘अब बस’. त्यामध्ये ती ऑनलाइन हाराशमेन्ट सारख्या गंभीर मुद्यावर बोलली होती.