home page top 1

‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’ सोनाक्षी सिन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांचा आवडता अभिनेता सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘दबंग’ ला ९ वर्ष पुर्ण होत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही चित्रपटसुष्टीत पदार्पण करुन तितकेच वर्ष होत आहे. चित्रपटामध्ये रज्जोची पहिलीच भूमिका साकारुन तिने चाहत्यांच्या मनात घर केले.

या निमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हानं या सिनेमाच्या खास आठवणी सर्वांशी शेअर केल्या. या सोबतच हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच खूप खास राहील असंही तिनं सांगितलं.

एका मुलाखतीमध्ये तिने सर्व अनुभव आणि चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सर्व गोष्टी शेअर केल्या. सोनाक्षी म्हणाली की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे आणि कायम तितकाच खास राहील. सोनाक्षीचा ‘दबंग ३’ लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच तिचा चित्रपटातील लुक प्रदर्शित झाला आहे.

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘दबंग 3’ येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सोनाक्षीचा लुक रिलीज करण्यात आला.

तिने हा चित्रपट तिचा शेवटचा असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. असे म्हणल्याने अनेकांना असा प्रश्न पडला असेल की सोनाक्षी चित्रपटसृष्टी सोडत आहे की काय ? पण असे नसून तिचा वर्षातील शेवटचा चित्रपट आहे. संपूर्ण वर्षातील सोनाक्षीचे एकूण चार चित्रपटांपैकी ‘दबंग 3’ हा शेवटचा चित्रपट असणार आहे.

त्यानंतर आता सोनाक्षीनं ‘दबंग 3’ हा माझा शेवटचा सिनेमा असेल असं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

मागच्या 9 वर्षात सोनाक्षीनं अनेक हिट सिनेमा दिले. सुरुवातीला स्टार किड्स म्हणून तिच्यावर बरंच प्रेशर होतं. याशिवाय पहिल्याच सिनेमात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केल्यानं तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

यावर्षी तिचे ‘कलंक’, ‘खानदानी शफाखाना’, ‘मिशन मंगल’ हे 3 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ‘दबंग 3’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षीने बरेच सुपरहिट चित्रपट दिले. याव्यतिरिक्त तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला. या सगळ्यांवर मात करुन तिने चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांच्या मनात वेगळे स्थाने निर्माण केले.
Loading...
You might also like