अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘सेक्सोलॉजिस्ट’च्या भूमिकेत ; ‘खानदानी शफाखाना’च पहिलं ‘पोस्टर’ रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सगळ्यात सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर लुक शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे. “खानदानी शफाखाना”. या चित्रपटाचा ट्रेलर २१ जून ला प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्या ट्विटर प्रोफाईलवर या चित्रपटाचा पहिला पोस्टर लुक शेअर केला आहे. या फोटोखाली तिने कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहले की, ‘मी जेवढे बोलेल तेवढी लोकांना लाज वाटणार आहे. खानदानी शफाखानाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.’ तुम्ही पाहू शकता या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत अनेक कलाकार दिसत आहे. यामध्ये सोनाक्षी सेक्सोलॉजिस्टची भूमिका साकारताना दिसणार आहे.

असे समजले आहे की, हा चित्रपट शिल्पी दासगुप्ताने डायरेक्ट केला आहे व भूषण कुमार, मृगदीप सिंह लांबा आणि महावीर जैन यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, वरुण शर्मा, अन्नू कपूर आणि बादशाह मुख्य भूमिकेत आहे. बादशाह या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटात सोनाक्षी एक पंजाबी मुलीची भूमिका साकारत आहे. तिला परिवाराचे सर्व लोक खूप प्रेम करत असतात आणि ही मुलगी आपल्या परिवाराच्या खुशीसाठी काहीही करु शकते.

सध्या सोनाक्षी सिन्हा दबंग ३ आणि मिशन मंगल चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. दबंग ३ चित्रपटाचे डायरेक्शन प्रभु देवा करत आहे. चित्रपटाला सलमान खान आणि अरबाज खान प्रोड्यूस करत आहे. ‘दबंग ३’ ची कथा शुक्लाने लिहली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा