मजुरांसाठी धावून आली सोनाक्षी, आपल्या पेंटिंग्जचा करणार ‘लिलाव’

मुंबई – हिंदी चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मजुरांच्या मदतीसाठी धावून आली आहे. ज्यांना रोजगार आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांचा रोजगार गेला त्या मजुरांना दोन वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं आहे. त्यामुळे मी स्वत: केलेल्या पेंटिग्जचा लिलाव करणार आहे. त्यातून येणाऱ्या पैशांतून मजुरांना किराणा साहित्य देण्यात येईल, असा संदेश देणारे व्हिडिओ सोनाक्षीनी आज ट्विट केला आहे.

https://twitter.com/sonakshisinha/status/1261181056629301249

सोनाक्षी सिन्हाने गेल्या 9 वर्षांत आपल्या कष्टाने हिंदी इंडस्ट्रीत स्वत:चं एक स्थान कमावलं आहे. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तिच्या पेंटिंग्जना मोठी किंमत मिळण्याची शक्यताही आहे. कोरोनाचा फटका बसलेले मजूर विविध राज्यांतून त्यांच्या राज्यांत परतत आहेत. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत हे पाहून सोनाक्षीने त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जर आपण दुसऱ्याच्या उपयोगी आलो नाही तर मग आपला चांगुलपणा कशात आहे. त्यामुळे मजुरांच्या उपयोगी पडण्यासाठी मी हा लिलाव करायचं ठरवलं आहे.’ सोनाक्षी आता भुज – द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे.