Sonakshi Sinha-Zaheer Iqbal | ना मंगलाष्टका, ना फेरे, अन्य धर्मातील जहीर सोबत रजिस्टर मॅरेज करणार सोनाक्षी?, ‘या’ दिवशी असेल रिसेप्शन!

नवी दिल्ली : Sonakshi Sinha-Zaheer Iqbal | बॉलिवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या विवाहाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. वृत्त असे आहे की, सोनाक्षी सिन्हा आपला दिर्घकाळापासूनचा बॉय फ्रेंड जहीर इक्बालसोबत विवाह करून नवीन जीवनाला सुरूवात करणार आहे.

यापूर्वी असे वृत्त होते की, सोनाक्षी आणि जहीर हे मुंबईत कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत इंटिमेट वेडिंग करणार आहेत.
परंतु आता नवीन वृत्तात सांगितले जात आहे की सोनाक्षी आणि जहीर हे रजिस्टर मॅरेज करणार आहेत.
सोनाक्षीच्या जवळच्या मित्राने झूमला सांगितले की, मला २३ जूनच्या सायंकाळी या जोडीच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.

सोनाक्षीच्या मित्राने सांगितले की, परंतु निमंत्रणात विवाहाच्या अ‍ॅक्युअल रिचुअल्सचा कुठेही उल्लेख नाही.
माझ्या माहितीनुसार दोघे २३ जूनला रजिस्टर मॅरेज करतील, विवाहाचे ग्रँड सेलिब्रेशन होणार नाही, फक्त वेडिंग पार्टी होईल.

सोनाक्षीच्या पार्टीची गेस्ट लिस्टसुद्धा चर्चेत आहे. या जोडीच्या पार्टीत सलमान खानपासून हीरामंडीच्या
कलाकारांसह बॉलिवुडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
या दोघांच्या नात्याची सुरूवात सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)