सोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का ? हे जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 17 जानेवारी : अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह राहत असून ती स्वतःचे रोज नवे फोटो शेअर करतेय. तसेच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तूर्तास सोनल एक वेगळ्या कारणाने चर्चेत आलीय. होय, सोनल एकदा नाही तर दोनदा लग्न करू इच्छित आहे.

सोनल चौहानने अलीकडे एका ताज्या मुलाखतीमध्ये ही इच्छा बोलून दाखवलीय. मी निगर्सप्रेमी असून निसर्गावर माझे खूप प्रेम करतेय. त्यामुळे मी दोनदा लग्न करू इच्छित आहे. आता निसर्ग व दोन लग्नाचा काय? संबंध असा प्रश्न अनेकांना पडलाय.

सोनल चौहानला एकदा समुद्र किनारी लग्न करायचे आहे. दुस-यांदा उंच पहाडावर. सोनलला लग्नाची स्वप्नं पडू लागली म्हटल्यावर तिचा मिस्टर राईट कोण? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर तिने याबद्दलही स्पष्ट केलंय. सध्या माझ्या आयुष्यात कोणीही नाही. मी सिंगल आहे, असेही तिने स्पष्ट केलंय.

सोनल एक मॉडेल, अभिनेत्री आणि पार्श्वगायिका असून तिने हिंदी चित्रपटाशिवाय तेलगू चित्रपटात काम केलंय. सोनलचा जन्म 16 मे, 1985 साली न्यू दिल्लीत झालाय. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील गार्गी कॉलेजमधील फिलोसॉफी ऑनर्समध्ये डिग्री मिळविलीय.

सोनलने हिमेश रेशमियाच्या अल्बममधून करिअरची सुरूवात केलीय. सोनलने मुकेश भटचा चित्रपट ’जन्नत’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. सोनल हि सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे इंस्टाग्रामवर 3.2 मिलियनहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. ’जन्नत’नंतर सोनल चौहानने अनेक सिनेमांत काम केलंय. मात्र, तिला हवे ते यश मिळाले नाही. यानंतर तिने ‘साऊथ’कडे आपला मोर्चा वळवला आहे.