Sonalee Kulkarni | ब्लॅक कलरच्या फिटिंग ड्रेसमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

पोलीसनामा ऑनलाइन : मराठमोळी अभिनेत्री आजवर जिने तिच्या अभिनयाने अप्सरा अशी वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सोनालीची एक अदा पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात. सोनाली तिच्या अभिनयासोबतच नृत्य आणि लूकने सर्वांचेच लक्ष नेहमीच वेधून घेत असते. सोनालीने अलीकडेच instagram वर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोमध्ये सोनाली खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. सध्या सोनोलीच्या (Sonalee Kulkarni) फोटोवर कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोनालीने इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेस मध्ये दिसत आहे. यावेळी सोनालीने विदाऊट मेकअप करत लूक शेअर केला आहे. विदाऊट मेकअप मध्ये देखील सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी सोनालीने ब्लॅक अँड व्हाईट थीम ठेवत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनालीने एका पेक्षा एक किलर पोजेस दिले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच मनमोहक आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीच्या या फोटोतील सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. सोनालीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की “In the beginning it was all black and white!” सोनालीचा हा ग्लॅमर लूक चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांबरोबरच अनेक कलाकार देखील कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.

सोनालीच्या (Sonalee Kulkarni) या फोटोवर आतापर्यंत 35 हजाराहून अधिक लाईक आले आहेत.
या तिच्या फोटोवर चाहत्यांबरोबरच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, मेघना एरंडे आणि सोनाली खेरे यांनी देखील कमेंट केले आहेत.
तर सोनालीच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होताना दिसत आहे.
सोनालीने आजवर झिम्मा, पांडू, तमाशा लाईव्ह, बकुळा नामदेव घोटाळे, नटरंग, क्षणभर विश्रांती, इरादा पक्का, अजिंठा, झपाटलेला २, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, टाइमपास 2, पोस्टर गर्ल, तुला कळणार नाही, हम्पी, हिरकणी, धुरळा, ग्रँड मस्ती, सिंघम 2 या चित्रपटातून आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करून तिचे अपडेट्स देत असते.

Web Title :- Sonalee Kulkarni | actress sonali kulkarni has shared photos in a black color mini short dress on her instagram