Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाबरोबरच नृत्य कौशल्याने सर्वांच्या मनात राज्य करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला (Sonalee Kulkarni) आज वेगळ्या अशा ओळखीची काही गरज नाही. सोनालीचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. सोनालीने (Sonalee Kulkarni) आज चित्रपटसृष्टीत अप्सरा अशी ओळख निर्माण केली आहे.
सोनाली सध्या तिच्या महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख प्रेक्षकांना करून देत आहे. या कार्यक्रमाचाच भाग म्हणून सोनालीने अमरावतीला भेट दिली. यावेळी ती अमरावतीतील खाद्यसंस्कृती त्याचबरोबर विविध जागांची माहिती देताना दिसली. अमरावतीतील प्रसिद्ध अशा अंबाबाई मंदिरात जाऊन तिने दर्शन घेतले. सध्या तेथीलच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहे.
सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत सोनालीने (Sonalee Kulkarni) कॅप्शनमध्ये म्हटले की,“अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”. सध्या सोनालीचा हा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ चाहत्यांना भावल्याचा दिसत आहे.
सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत.
तर अनेकांनी तिच्या व्हिडिओवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. सोनालीला खरी प्रसिद्धी ‘बकुळा नामदेव घोटाळे’
या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ती ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली.
Web Title :- Sonalee Kulkarni | marathi actress sonalee kulkarni played gondhal at Amravati ambabai mandir video viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Parbhani Crime News | शेतात काम करत असताना वीज कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी कार चालकाकडून महिलेला मारहाण