पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sonalee Kulkarni | मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ पाडत असते. सोनाली तिच्या अभिनयासोबतच नृत्यामुळे देखील ओळखली जाते. सोनालीचे नृत्य पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. सोनाली सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. या व्हिडिओवर चाहते देखील भरभरून प्रेम देत असतात. आता सोनालीने राजस्थानमधील वाळवंटातील नृत्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Sonalee Kulkarni)
राजस्थान मध्ये सोनाली 10 अंश तापमानात नृत्य करताना दिसत आहे. सोनाली सध्या राजस्थान मधील जैसलमर येथे गेली आहे. तेथील अनेक फोटो आणि व्हिडिओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आता तेथील वाळवंटात नृत्य करत तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर देखील दिसत आहे. यावेळी सोनाली लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘चुडिया खनक गयी’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत सोनालीने म्हटले की, “10 अंश तापमानात नाचायची हौस …. अर्थात आम्ही फिल्मी आहोत… डान्सर आहोत… श्रीदेवीचे फॅन्स आहोत आणि वेड्या तर आहोतच आहोत…… म्हणून 20-20 रिटेक केल्या. तोल जात होता… घसरत होतो…… पडत होतो ….. तरी मजा करत होतो”. (Sonalee Kulkarni)
व्हिडिओ शेअर करत सोनालीने कॅमेरामनला देखील संयमासाठी धन्यवाद दिले आहे.
सध्या सोनालीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
अनेकांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तर काहींनी “खूप छान झाला आहे व्हिडिओ”
असे म्हणत सोनालीचे आणि फुलवाचे कौतुकही केले आहे.
Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni dances on shridevi song in rajasthan video went viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण