Sonalee Kulkarni | ‘वाईट गोष्टी संपून आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत’ सोनाली कुलकर्णीची पोस्ट व्हायरल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. तिने नुकतीच कोरोना (Corona) काळाविषयी भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सोनालीने (Sonalee Kulkarni) कोरोना काळातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनालीने आपल्या इन्स्टा अकाउंटवरून (Instagram) हि पोस्ट केली आहे.
सोनालीने (Sonalee Kulkarni) आपल्या पोस्टमध्ये “Looking at you 19th November!!! 18 महिन्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात आपला सिनेमा प्रदर्शित होणारे….हे पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती सारखं वाटतंय..लहानपणापासून मोठ्या पडद्याची ओढ होती…त्याच्यावर झळकण्याची संधी 12 वर्षं सलग मिळाली…Pandemic मुळे आपण सगळ्यांनीच अतिशय वाईट दिवस पाहिले, हा मोठा पडदा ही त्याला अपवाद नाही…पण या अश्या वाईट गोष्टी संपाव्यात आणि आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत म्हणून आपण “झिम्मा” हा खेळ खेळतो. आम्ही तो खेळायला सज्ज झालोय, 19 नोव्हेंबर पासून, तुम्ही पण या. सामील व्हा.”
सोनाली कुलकर्णी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काही दिवसातच ‘झिम्मा’ (Jhimma Movie) हा मराठी सिनेमा चित्रपटगृहांत झळकणार आहे. अनेक नायिकांसोबत सोनालीही ‘झिम्मा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. साखरपुडा आणि लग्न या कालावधीमधील द्विधा मनस्थितीत असलेली मुलगी तिने या सिनेमात साकारली आहे.
Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni shares special post for corona pandemic and upcomeing film
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD
Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…
Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात
Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन