‘अप्सरा’ सोनालीच्या घरी ‘लगीन’घाई ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी अभिनेत्री आणि अप्सरा अशी ओळख असणारी सोनाली कुलकर्णी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. सोनालीनं सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर आता तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनालीनं तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा उल्लेख केलेला नसला तरी त्याला पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

व्हिडीओ शेअर करताना सोनाली म्हणते, “माझ्या पार्टनरसोबत नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. चढ-उतार आणि साहसाठी सज्ज आहे.” सोनालीनं एक अ‍ॅडव्हेंचर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या पार्टनरबद्दल सोनाली बोल आहे त्याचं नाव कुणाल बेनोडेकर आहे. सोनालीनं त्याचा उल्लेख केलेला नाही. परंतु त्याला पोस्टमध्ये टॅग केलं आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा आहे परंतु कामानिमित्त तो दुबईत असतो. सोनाली सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरकणी, धुरळा, विकी वेलिंगकर असे एका पाठोपाठ एक तिचे सिनेमे रिलीज झाले आहेत. सध्या चाहत्यांचं लक्ष याकडे लागलं आहे की, सोनाली लग्नाची तारीख कधी घोषित करते.