सोनालीच्या वाढदिवसानिमित्त सुझानने शेअर केली अशी पोस्ट 

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक दिवसापासून कर्करोगाशी लढत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपला वाढदिवस खास पद्धतीने आपल्या मैत्रिणीसोबत सेलिब्रेट केला. सोनालीची जिवलग मैत्रीण असलेली सुझानने सोनालीच्या धाडसाचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे.

मंगळवारी सोनालीचा ४४ वा वाढदिवस होता. सुझानने हा वाढदिवस साजरा करत यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोसोबतच तिने मोठी पोस्टही शेअर केली आहे. आमची सर्वात मौल्यवान, सुंदर राजकुमारी योध्दा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण इथून पुढेही नेहमी एकमेकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देऊ, अशी आशा व्यक्त करते, असे म्हणत सुझानने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीने आपला हा खास दिवस मित्रांसोबत आणि परिवारासोबत घालवला.

मागील वर्षी जुलै महिन्यात सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. यानंतर सोनालीने सहा महिने न्यूयॉर्कमध्ये उपचारदेखील घेतले होते. उपचारांनंतर डिसेंबर महिन्यात ती मुंबईला परतली आहे. कर्करोगासोबतच्या तिच्या लढ्यात पती गोल्डी बहल सोबत तिच्या मित्रपरिवाराने नेहमी तिला साथ दिली.