अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं शेअर केली ‘इमोशनल’ पोस्ट अन् म्हणाली ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कर्करोगावर मात करुन आपली नवीन ओळख निर्माण करणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक मोनोक्रोम फोटो शेअर करुन चाहत्यांना धन्यवाद म्हणाली आहे. हा फोटो शेअर करुन सोनालीने कर्करोग झाल्यानंतर तिला ज्याप्रकारे चाहत्यांनी सपोर्ट केला आणि तिला प्रोत्साहन दिले त्याबद्दल तिने चाहत्यांचे आभारे मानले आहे.

सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन लिहले आहे की, ‘आपल्या वेदनामधून मजबूत व्हा…हिम्मत वाढवा. तुम्ही स्वतःसाठी खूप महत्वपुर्ण आहात. तुम्ही माझी मदत केली आहे त्यामुळे मी खूप खुश आहे. तुम्ही मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.’

याआधी सोनालीने ५व्या इंटरनॅशनल कॉन्फरंस CAHACON 2019 मध्ये सांगितले होते की, ‘कर्करोगचे लवकर निदान कळणे गरजेचे आहे. भविष्यात हा रोग भयानक नाही पण याचा उपचार खूप भयानक आणि वेदनादायक आहे. जर याचे निदान लवकर कळाले तर उपचारास कमी पैसे आणि वेदनाही कमी होतात.’

सोनालीने याआधी देखील कर्करोगाच्या उपचारा दरम्यान होणाऱ्या वेदनेबाबत अनेकदा उल्लेख केला आहे. एक वर्षाआधी सोनाली बेंद्रेला कर्करोग असल्याचे कळाले होते. तिला एवढा मोठा रोग असल्याचे इंडस्ट्रीमध्ये कळताच बॉलिवूड आणि चाहते सगळे आश्चर्यचकित झाले होते. न्यूयार्कमध्ये काही काळ कर्करोगावर उपचार केल्यानंतर सोनालीने या रोगावर मात करुन मुंबई परतली. सोनालीला हाई-ग्रेड मेटिस्टिक कर्करोग झाला होता. उपचारा दरम्यान सोनाली आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यामातून आपल्या उपचाराबद्दल अपडेट्स देत होती.

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा