जुन्या आठवणींना उजाळा देत सोनाली बेंद्रेनं शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांसोबतच सेलेब्सही ‘फिदा’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार आणि एक कॅन्सर सर्वाईवर सोनाली बेंद्रे हिनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केाल आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. यात व्हिडीओत जुन्या जमान्यातील फॅशन दाखवण्यात आली आहे. ज्यात आउटफिट्ससोबत मेकअपही मॅच करताना दाखवण्यात आला आहे. सोनालीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, “मॅचिंग आउटफिटसोबत मॅचिंग लिपस्टिक लावण्याचे ते दिवस. #FlashbackFriday.”

सोनालीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर सोनालीनं रेड पोल्का डॉट वाला ड्रेस घातला आहे. रेड लिपस्टिकही लावली आहे. सोनालीचा हा लुक आणि व्हिडीओ साऱ्यांनाच आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सनदेखील तिचं कौतुक केलं आहे.

सोनालीच्या या व्हिडीओवर अभिषेक बच्चन, महीप कपूर, पत्रलेखा, ताहिरा कश्यप, अशा अनेकांनी हॅप्पी इमोजीसोबत कमेंट केली आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत सोनालीनं लॉकडाऊनबद्दल बोलताना या काळात ती काय करत आहे हे तिनं सांगितलं होतं. ती म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये मी योगा शिकत आहे. याशिवाय सायंस फिक्शन बुक्स वाचणं, डॉगीसोबत खेळणं अशा प्रकारे टाईम स्पेंड करत आहे.