Sonali Bendre | सोनाली बेंद्रेच्या हँडसम मुलाला पाहिले का? हिरो होण्याआधीच तरुणी पडल्यात प्रेमात

पोलीसनामा ऑनलाइन – Sonali Bendre | आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी बॉलीवुडमधील अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिचे सर्वत्र चाहते आहेत. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने एक दशक गाजवले आहे. सोनाली आता जरी सिनेमांमध्ये झळकत नसली तरी तिच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

Advt.

सोनालीच्या सौंदर्यावर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरही (Pakistani cricketer Shoaib Akhtar) फिदा झाला होता. मात्र तिने गोल्डी बहल (Goldie Behl) यांच्याशी विवाह केला. गोल्डी बहल आणि सोनाली बेंद्रे यांचे सुखी वैवाहिक जीवन आहे. गोल्डी आणि सोनालीला रणवीर बहल (Ranveer Behl) नावाचा मुलगा देखील आहे. त्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहे. सोनालीचा मुलगा रणवीर हा हँडसम असून अनेक तरुणी त्याच्या प्रेमात पडत आहेत. रणवीरने आता आईप्रमाणे सिनेविश्वात पदार्पण करावे आणि हिरो बनावे अशी इच्छा नेटकरी व्यक्त करत आहेत.

रणवीर बहलकडे पाहून असे वाटणार नाही की सोनाली बेंद्रे ही एवढ्या मोठ्या मुलाची आई आहे. 2018 साली सोनालीला कॅन्सर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.( Sonali Bendre Cancer) मात्र त्यामधून ती पूर्णपणे बरी झाली असून आता ती आपल्या कुटुंबासोबत सुखाने जगत आहे.

मागील दिवाळीत सोनालीने आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून नेटकऱ्यांनी रणवीरला हेरले असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सोनालीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये सोनाली, गोल्डी आणि रणवीर शाही स्टाईलमध्ये पोज देत आहेत. तेव्हापासून रणवीरच्या चर्चेला उधाण आले असून अनेक तरुणी सोनालीच्या हैंडसम मुलाच्या प्रेमात पडल्या.

सोनाली बेंद्रेच्या (Actress Sonali Bendre) या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंटस् दिल्या.
त्याची आकर्षक पर्सनॅलिटी पाहून लोक म्हणाले की, “याला हिरो बनवा.”
पोस्टवर कमेंट करताना एकाने लिहिलं आहे की, ‘मुलगा खूप मोठा झाला आहे. आम्हाला माहीतही नव्हते’.
तर दुसऱ्याने लिहिले, ‘परफेक्ट फॅमिली पिक्चर’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘ओएमजी रणवीर हे कधी.. एवढेच नाही तर लोकांनी पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.

Web Title :  Sonali Bendre | sonali bendre son ranveer behl is young handsome man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)