दीपिका पदुकोणनंतर मराठी स्टारही उतरले मैदानात, ‘या’ अभिनेत्रीनं केला JNU हल्ल्याचा निषेध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयूमध्ये काही बुरखाधारी लोकांनी घुसून तेथील विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचे तीव्र संतप्त पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. या प्रकारानंतर मुंबईसह देशात सर्वत्र निदर्शने सुरू आहेत. अशातच समाजातील बुद्धीवंत, कलाकार आदी मंडळीही सरसावली आहेत. काल जूएमनयूमध्ये जाऊन बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दिला. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा जूएनयू विद्यार्थ्यांसाठी पुढे आल्याचे दिसत आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा विद्यार्थ्यांवरील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

जेएनयू हल्ल्यानंतर बॉलिवूमधील सेलिब्रेटी मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. स्वरा भास्कर तर पहिल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी आहे. तर अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, टि्ंवकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी यापूर्वी निषेध केला आहे. काल या हिंसाचाराचा निषेेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण ही कन्हैया कुमारसोबत जेएनयूमध्ये दाखल झाली होती. दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि निषेध नोंदविला. या हल्ल्यास सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटले आहे. असा भ्याड हल्ला करणार्‍या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

दरम्यान, दीपिकाने अन्य कोणताही विचार न करता विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा धाडसाने निषेध केल्याने सोलश मीडियावर अनेकांनी तिचे कौतूक केले आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही पुढे येऊ लागले आहेत. आघाडीची मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जेएनयू हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. आपल्या देशात तुम्हाला आंदोलन करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे सोनालीने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना म्हटले असून मी तुमच्या सोबत आहे, असे जाहीर केले आहे.

दरम्यान, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीनंतर धाडसाने पुढे येऊन निषेध करणार्‍या दीपिकाला भाजप समर्थक यूजर्सने ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तिच्या छपाक सिनेमावर बंदी आणा, असे आवाहन केले जात आहे. तर अनेक यूजर्सने दीपिकाच्या बाजूने मतप्रदर्शन केले आहे. याबाबत ट्विटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशी टीका भाजप समर्थक यूजर्सने केली असून तिचा छपाक सिनेमा पाहू नका, असे आवाहन करण्यास सुरूवात केली आहे.

5 जानेवारीला रात्री काही बुरखाधारी लोकांनी जेएनयू विद्यापीठात घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली होती. या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईमध्ये अनेक सेलिब्रेटी आंदोलन करताना दिसले. दिग्दर्शक विशाल भारद्वाजने या आंदोलनात एक कविता सादर केली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. मोजो स्टोरी या युट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ही कविता विशाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केली आहे. या कवितेत म्हटले आहे की, हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं, जैसा सोचा था तुम वैसे ही निकले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/