…म्हणून सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोंना मिळतेय अधिक पसंती 

मुंबई : वृत्तसंस्था – सगळ्याच मराठी अभिनेत्री सध्या आपल्या लुक, स्टाइल आणि फिटनेस बाबत पूर्वीपेक्षा अधिक सजग झाल्या आहेत. नेहमी या अभिनेत्री आपले ग्लॅमरस अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या या फोटोंना चाहते सुद्धा भरभरून लाइक्स करतात. अशाच या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचे नाव सामील झाले आहे.

सोनाली कुलकर्णीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला चाहते भरपूर पसंत करत आहे. हिचे हे फोटो पाहून कोणालाच वाटणार नाही की तिने चाळीशी गाठली आहे. या फोटो मध्ये सोनाली अधिक ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या करिअरच्या सुरूवातीचे फोटो आणि सध्याचे फोटो यावर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणाच्याही लक्षात येईल. सोनालीने आजपर्यंत अनेक मराठी-हिंदी चित्रपटात अभिनय करून आपली छाप पाडली आहे.

चाळीशीत असलेल्या सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. आपल्या अभिनयाबाबत सजग असणारी सोनाली आपल्या फिटनेसबाबत सुद्धा तेवढीच जागरूक आहे. त्यामुळेच कदाचित चाळीशीत सुद्धा सोनाली तितकीच फिट दिसत आहे.

www.instagram.com/p/Bqm2PqgBP6X/?utm_source=ig_embed

सोनालीला सायकलिंगची आवड आहे. तसेच ती एक उत्तम सायकलिस्ट आणि रनर सुद्धा आहे. दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि २०-२५ किमी सायकलिंग करते. आपल्यामुळे इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी ती स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रविवारीसुद्धा सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष करत नाही.