ग्लॅमर पासून निवडणूकीपर्यंत, असा राहिला ‘या’ TikTok स्टारचा प्रवास (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत हिसारच्या आदमपुर विधानसभा मतदारसंघातून ट‍िकटॉक स्टार आणि अभिनेत्री सोनाली फोगाट हिला भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यानंतर आता तिने या जागेशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल तसेच तिने राजकारणात प्रवेश का केला यावर भाष्य केले आहे.

याविषयी अधिक बोलताना तिने सांगितले कि, तिचे लहानपण या ठिकाणी गेले असून तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण येथील गावात झाले असून 12 वी हिसारमध्ये झाली आहे. तिने सांगितले कि, दहा वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात काम करत असून 18 ऑक्टोबर रोजी तिचा नवीन सिनेमा येत आहे. राजकारणातील प्रवेशाविषयी बोलताना तिने सांगितले कि, 12 वर्षांपूर्वी मी सुमित्रा महाजन यांना खासदार होताना पहिले होते. त्यानंतर मला देखील राजकारणात प्रवेश कारण्याची प्रेरणा मिळाली.

 

सुरुवातीला ती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होती, मात्र आता तिला आदमपुर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. याआधी तिने अनेक ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून काम केले असून राष्ट्रीय स्तरावर देखील भाजपचा मोठ्या प्रमाणात प्रचार कला आहे. त्यानंतर आता तिला पक्षाने तिकीट दिले आहे.

दरम्यान, आपल्या विरोधी उमेदवाराविषयी बोलताना तिने सांगितले कि, विरोधी उमेदवार तगडा असून तिच्यासाठी हि निवडणूक अवघड असणार आहे. मात्र ती पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून विजयासाठी प्रयत्न करणार आहे.