‘ही’ TikTok ‘स्टार’ बनली BJP ची उमेदवार, तिकीट मिळाल्यानंतर फक्‍त ‘कल्‍ला’ अन् वाढले फॉलोवर्स (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लोकांमध्ये व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप TikTok ची क्रेझ प्रचंड आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. ही क्रेझ आहे की आता राजकीय पक्षांना देखील याची दाखव घ्यावी लागत आहे. याचे याजे उदाहरण म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकिट दिलेला उमेदवार म्हणजे TikTok स्टार आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या फॉलोवर्स मध्ये तिकीट मिळाल्यानंतर आणखी वाढले आहेत.

दरम्यान, हरियाणा भाजपाच्या नेत्या सोनाली फोगट आधीपासूनच TikTok स्टार आहेत. त्या एक प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. आजकाल सोनाली टिकटोक वर खूपच जास्त अ‍ॅक्टिव आहे. २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी सोनाली यांना भाजपने आदमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तिकीट मिळाल्यानंतर लोक त्यांचे अभिनंदनही करत आहेत.

हरियाणाच्या राजकीय वर्तुळात सोनाली यांना तिकिट मिळण्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यातच तिकिटे मिळताच त्यांच्या TikTok संख्या अचानक वाढली. सध्या सोनालीचे व्हिडिओ TikTok वर मोठ्या प्राणावर व्हायरल होत आहेत. त्यांचे व्हिडिओ TikTok वर @sonaliphogat या अकाउंट वर उपलब्ध आहेत. तेथे त्यांचे फॅन व्हिडिओ पाहून त्यांवर मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.

असे आहे करिअर
सोनालीने करिअरची सुरुवात टीव्ही अँकर म्हणून केली. यानंतर सोनालीने चित्रपट अभिनयात पाऊल ठेवले. यानंतर सोनालीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली. हरियाणा भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा असणाऱ्या सोनाली फोगटचे लग्न झाले आहे. पण अलीकडेच तिच्या पतीचा रहस्यमयी मृत्यू झाला. गेल्या सात-आठ वर्षांपासून सोनाली भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्या भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्या देखील आहेत.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या