#VIDEO : सोनालीची ‘बूम जवानी…’ पहाल तर पहातच रहाल… बोल्डनेसचा तडका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाली सहगल तिच्या हॉट आ णि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोंना आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळत असते. तिचा बोल्डनेस चाहत्यांना विशेष आवडतो. नुकतेच सोनालीचे एक गाणे सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. बूम जवानी असं या व्हायरल होणाऱ्या गाण्याचं नाव आहे. तिच्या या गाण्याने तरुणाईला वेड लावल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओत सोनाली सहगल आयटम साँग करताना दिसत आहे. सेटर्स सिनेमातील हे आयटम साँग आहे. सोनालीच्या घायाळ करणाऱ्या अदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. बूम जवानी असं सोनालीच्या आयटम साँगचं नाव आहे. सध्या हे गाणं चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. सोनालीचं हे गाणं 23 लाखांहून अधिक लोकांनी आतापर्यंत पाहिलं आहे. 12 हजाराहून अधिक लोकांनी हे गाणं लाईक केलं आहे.

सेटर्स हा सिनेमा 3 मे रोजी प्रदर्शित होणार असून, अश्विनी चौधरी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमात आफताब शिवदासानी आणि श्रेयस तळपदे झळकणार आहेत. अभिनेत्री इशिता दत्ता ही देखील या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण बऱ्यापैकी झाले आहे. एका क्राईम थ्रिलरवर हा सिनेमा आधारीत असणार आहे.