‘फ्रेन्डशिप डे’ च्या निमित्ताने सोनालीचे ट्विट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. हा फोटो काहीसा भावूक करणारा आहे. पण सोनालीचा मॅसेज मात्र खूपच पॉझिटीव्ह आहे. या फोटोत सोनाली बाेल्ड लूकमध्ये दिसतेय. म्हणजे, तिने डोक्याचे मुंडण केले आहे. पण तिच्या चेहऱ्यावरची भलीमोठी स्माईल नवी उमेद देणारी आहे.
[amazon_link asins=’B0749P2H71′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5b24f39-989d-11e8-a53c-dfc481f3fd57′]

हा फोटो शेअर करत सोनाली लिहिते, ‘ ही मी आहे आणि सध्या खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे काहीशा विचित्र नजरेने बघतात. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मनमुराद जगते आणि प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याची संधी शोधत असते. हो, सध्या मी वेदनेतून जातेय. पण आता मला जे आवडते, तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत वेळ घालवते. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.