Sonam Kapoor | सोनम कपूरने विमानतळावर फोटोग्राफर्सना केली ‘हि’ विनंती; म्हणाली “कृपया…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सध्या बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) खूपच चर्चेत आहे. नुकतच तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अनेक महिन्यांनी तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी तिने फोटोग्राफरला केलेल्या विनंतीमुळे पुन्हा एकदा ती (Sonam Kapoor) चर्चेत आली आहे.

 

सोनमने आपल्या मुलाचे नाव वायू असे ठेवले आहे. सोनम मुलाची खूपच काळजी करताना दिसत असते. सोनम कपूर (Sonam Kapoor) मुलाबाबतीत खूपच जागरूक आहे. नुकतीच ती विमानतळावर मुलासोबत दिसली होती. यावेळी फोटोग्राफनी तिच्याकडे फोटोसाठी मागणी केली तेव्हा तिने स्वतःचे फोटो काढू दिले मात्र यावेळी ती म्हणाली कृपया करून माझ्या मुलाचे फोटो काढू नका तिच्या या मागणीला फोटोग्राफरने देखील मान्य केले. याआधी तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती पहिल्यांदा वायूला सोडून एक आंतरराष्ट्रीय प्रवास करत होती. त्यावेळी तिला चैन पडत नसल्याचे तिने व्हिडिओ मधून व्यक्त केले होते.

मुलाच्या जन्मा आधी प्रेग्नेंसी दरम्यान सोनमने केलेल्या फोटोशूटमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. ‘वीरे दी वेडिंग’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘खूबसूरत’ या चित्रपटांमध्ये तिने उत्तम अभिनय साकारले होते. तर आता लवकरच सोनम सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Sonam Kapoor | actress sonam kapoor ahuja protective mom tells paps not to click son vayus photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स