सोनम कपूर, आनंद आहुजाच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण ; जुन्या आठवणी केल्या ताज्या…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. सोनम कपूर ने ८ मे ला दिल्लीचे व्यापारी आनंद आहुजा यांच्यासोबत लग्न केले. सोनमचं लग्न शीख पद्धतीने झाली. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन ठेवले होते. एक वर्षानंतर सोनमच्या विवाहाती आठवणी पुन्हा ताजा झाल्या. सोनम कपूरचा वेडिंग अल्बम सोबत तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी सांगण्यात येईल. सोनम कपूरची मेहेंदी आणि तिचा संगीतचा कार्यक्रम तिचे वडील अनिल कपूर यांच्या घरी करण्यात आला. त्यानंतर तिची मावशी कविता सिंह यांच्या घरी लग्नाचे कार्यक्रम करण्यात आले.

त्यानंतर मुंबई मध्ये ५ स्टार हॉटेल ‘द लीला’ मध्ये रिसेप्शन साजरे झाले. बॉलीवूड मधील सगळे दिग्गज उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून डान्स केला व उत्साह वाढवला. सोनम ने तिच्या लग्नाला लाल कलरचा घागरा घातला होता. हातात बांगड्या आणि दागिने घालून सोनम सुंदर दिसत होती. सोनमच्या लग्नात पूर्ण बच्चन परिवार, करीना कपूर, तैमूर, जैकलीन फर्नांडिस, वरुण धवन, करिश्मा कपूर, स्वरा भास्कर आणि आणखी अभिनेता- अभिनेत्री आले होते.

सोनम कपूरचे मेहेंदी आणि संगीतचे व्हिडिओ समोर आले होते. त्यात सोनम तिचे वडिल अनिल कपूर यांच्यासोबत डान्स करताना व्हिडिओ आले होते. सोनमच्या रिसेप्शन ला शाहरुख खान आणि सलमान खान यांनी खूप मज्जा केली.

सोनम आणि आनंद यांची ओळख २०१४ मध्ये झाली आणि त्यांची लव्ह स्टोरी चालू झाली. परनिया कुरैशी दोघांची मैत्रीण आहे. सोनम कपूर सोबत बोलणं झाल्याच्या १ महिन्यानंतर आनंदने प्रपोज केलं. तेंव्हापासून त्यांच्या दोघांच्या रिलेशनशिपला सुरवात झाली आणि मे २०१८ मध्ये सोनम आणि आनंद यांचे लग्न झाले. आनंद फैशन ब्रांड Bhane चा मालक आहे. त्याने व्हार्टन बिजनेस स्कूल (US) मधून आपले शिक्षण पूर्ण केले. Bhane सोनमचा फॅशन ब्रँड मधील एक ब्रँड आहे. खूप वेळा तिला Bhane ब्रँड चे कपडे घालताना बघितले आहे. आनंदचा वार्षिक व्यापार सुमारे 28 अब्ज रुपये आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like