डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर, म्हणाली – ‘व्यर्थ गोष्टींवर वेळ वाया घालवत आहेत’

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या जगभर कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सर्वजण एकत्र येऊन कोरोनासोबत दोन हात करताना दिसत आहेत. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं. यानंतर अभिनेत्री सोनम कपूर हिनं नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या ट्विटवर सोनमनं आपला राग व्यक्त केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की, “मी ब्रिटेन आणि त्यांच्या महाराणीचा चांगला मित्र आणि चाहता आहे. असं म्हटलं जात होतं की, शाही कुटुंब सोडणारे हॅरी आणि मेघन कायमचे कॅनडात राहतील. आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडाला सोडलं आहे. अमेरिका त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेणार नाही. याचा खर्च त्यांना स्वत:ला उचलावा लागेल.”

ट्रम्प यांचं ट्विट पाहून सोनम कपूर भडकली. तिनं हे ट्विट रिट्विट करत लिहिलं की, “अमेरिकन्सला नक्कीच सध्या लाजिवरवाणं वाटत असेल. सध्या जागतिक महामारीनं साऱ्यांचा जीव जात आहे आणि ट्रम्प मात्र त्यांचा वेळ मुर्खपणाच्या गोष्टींवर वाया घालवत आहेत.” सध्यो सोनम कपूरचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी सोनमच्या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत