आनंद आहुजासोबत ‘रोमँटीक’ झाली सोनम कपूर ! KISS करतानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात कोरोनामुळं लॉकडाऊन आहे. अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. अशात एक व्हिडीओ समोर आला ज्यात ती पती सोबत दिसत आहे. त्याचे केस नीट करतानाच ती अचानक रोमँटीक होताना दिसत आहे. सध्या सोनमचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सोनमचा एक व्हिडीओ व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सोनम आधी पती आनंदचे केस नीट करत आहे. नंतर ते दोघं काही तरी बोलतात आणि सोनम त्याला अचानक किस करते. यानंतर दोघंही स्माईल करतात. अलीकडेच सोनम आपल्या काही हॉट फोटोंमुळं चर्चेत आली होती. यानंतर आता तिनं या किसिंगवाल्या व्हिडीओनं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.