Sonam Kapoor | अभिनेत्री सोनम कपूरच्या डॅशिंग लूकने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) आजवर ‘आयशा’, ‘सावरिया’, ‘विरे दी वेडिंग’, ‘रांझणा’ असे हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. मात्र आता काही दिवसांपासून सोनम चित्रपटसृष्टी पासून दूर आहे. कारण सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्ती झाले. सध्या सोनम तिच्या मुलाला तिचा पूर्ण वेळ देण्यात व्यस्त आहे. नुकताच सोनमचा (Sonam Kapoor) एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आला होता. पुन्हा एकदा सोनमच्या लूकमुळे ती चर्चेत आली आहे.
सोनम जरी चित्रपटसृष्टी पासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेल्या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाईट रंगाची साडी त्याचबरोबर हाफ व्हाईट रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. तर केस मोकळे सोडत सिम्पल मेकअप न्यूड लिपस्टिक लावत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. सोनमच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सोनमच्या फोटोवर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे. तर सोनमच्या या फोटोवर कमेंट करत ती सुंदर दिसत असल्याचे बोलले आहे.
सोनम (Sonam Kapoor) शेवटची 2020 मध्ये ‘एके वर्सेस एके’ या चित्रपटात झळकली होती.
तर ती आता लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या प्रेक्षक सोनमच्या ब्लाइंड या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सोनमने नुकताच शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या आऊटफिट मध्ये दिसत आहे.
तिचे हे फोटो देखील जोरात वायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये सोनमने संपूर्ण ब्लॅक आऊटफिट कॅरी करत मनमोहक अदानी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Web Title :- Sonam Kapoor | bollywood sonam kapoor shared glamours look in black outfits see her photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update