…म्हणून अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर गेली नव्हती ‘हनीमूनला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरचे मागच्या वर्षी बिजनेसमॅन आनंद अहूजा यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्न होताच सोनमला आपल्या कामासाठी बाहेर जावे लागले त्यामुळे त्यांना हनीमूनला जाता आले नाही. सोनम लग्नानंतर ‘वीरे द वेडिंग’ चित्रपटासाठी खूप व्यस्त होती.

त्यामुळे तिला आपल्या पतीसोबत बाहेर जाऊ शकली नाही. लग्नानंतर अभिनेत्री सोनम कपूर लगेचच ‘कान्स चित्रपट फेस्टिवल’ साठी गेली होती. त्याचदरम्यान आनंद आहूजा ही खूप आपल्या कामात व्यस्त होते. दोघांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. यांच्या लग्नाला १ वर्ष झाले आहे.

याबाबतीत सोनम कपूर आहूजा म्हणाली की, ती लग्नानंतर हनीमूनला जाऊ शकली नाही. यामुळे ती सध्या आपल्या पतीसोबत हनीमून व लग्नाचा वाढदिवस एकत्र साजरा करण्यासाठी जपानला फिरायला गेली आहे. सोनमने आपल्या इन्स्टाग्रामवर जपानमधील फोटो शेअर केले आहे. तिने पती आनंद आहूजा यांना पत्र लिहून धन्यवाद म्हणाली आहे.

View this post on Instagram

Day 3

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

सोनमने तिचा आणि आनंदचा एक फोटो आठवणीत राहण्यासाठी फोटोखाली कॅप्शन लिहले, ‘मी नेहमी स्वतःला म्हणत असते, मी खूप भाग्यशाली आहे की, माझे माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्न झाले.’ सोनमने या महिन्यातच आपला वाढदिवस साजरा केला होता.

View this post on Instagram

Day 1

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

सोनमबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘द जोया फैक्टर’ चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट लेखक अनुज चौहान या नावाच्या उपन्यासवर आधारित आहे.

View this post on Instagram

Day 2

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

 

आरोग्य विषयक वृत्त

कॅल्सिफिकेशन आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे आणि त्यावरील उपाय 

‘हे’ सोपे उपाय अवलंबा आणि नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्सचे नियंत्रण करा 

गरोदरपणात महिलांना असते ५० टक्के फॉलिक अ‍ॅसिडची गरज 

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक

You might also like