..म्हणून सोनम कपूरचा पती आनंद आहुजा वडिलांऐवजी लावतो सोनमचं नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनम कपूरने 2018 मध्ये आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. शीख पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले होते. यानंतर सोनमने आपल्या नावात बदल करत सोनम कपूर आहुजा असं केलं होतं. यानंतर सोनम सोशलवर ट्रोल झाली होती. परंतु नावातील बदल हा केवळ सोनमनेच नाही तर आनंदनेदेखील केला होता. सोनमने नुकताच याबाबत खुलासा केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना सोनमने याबाबत माहिती दिली आहे. फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या(FLO) 35 व्या वार्षिक सत्रामध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलताना सोनमने आनंदचे कौतुक केले. आनंद तिचा चिअरलिडर आहे असे सांगत सोनम म्हणाली की, “एक महिला असल्याने मला बॉलिवूडमध्ये कायम दुय्यम दर्जा देण्यात आला. केवळ महिला असल्याने कोणत्याही स्त्रीने कधीच कोणती तडजोड करू नये. तिने तिच्या निर्णयावर कायमच ठाम राहिले पाहिजे. लग्नानंतर माझ्या पतीने आनंदने कायम मला पाठिंबा दिला आहे. खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा राहिला आहे. इतकेच नाही तर त्याने त्याच्या नावातही बदल केला. त्याच्या नावापुढे त्याने माझे नाव जोडत आनंद सोनम आहुजा असं केलं.”

https://www.instagram.com/anandahuja/

पुढे बोलताना ती म्हणाली की, “आनंद माझा चिअरलिडर आहे. माझ्याशी लग्न करून त्याने मला नवीन ओळख दिली आहे. एवढे करून तो थांबला नाही त्याने माझा आदर करत माझ्या नावाचा समावेशही त्याच्या नावात केला.” असे सोनम म्हणाली. आनंदने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर त्याचे नाव आनंद एस आहुजा असं केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us