JNU : आदित्य ठाकरेंच्या ‘ट्विट’ला सोनम कपूरनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. यामध्ये राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जेएनयू घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत सोनम कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. विरोध करताना विद्यार्थ्यांना ज्या हिंसाचार आणि क्रूरतेचा सामना करावा लागला ते चिंताजनक आहे. जामिया विद्यापीठ असो किंवा जेएनयू विद्यार्थ्यांवर क्रूरता झाली नाही पाहिजे. या गुंडाना कारवाईचा सामाना करावा लागेल. विद्यार्थ्यांना वेळेवर आणि लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटला अभिनेत्री सोनम कपूरने रिट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. सोनम कपूरने ट्विट करत लिहले आहे की, आम्हाला अशाच नेत्याची गरज आहे. आशेचा किरण अजून आहे. असे सोनम कपूरने ट्विटमध्ये म्हटले आहे. सोनम कपूर आणि आदित्य ठाकरे यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी देखील दोन्ही ट्विटला रिट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/