सोनम कपूरनं बोल्ड फोटो शेअर थेट देवालाच केला ‘असा’ प्रश्न ! ट्रोलर्सनं घेतला ‘समाचार’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सोनम कपूर हिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. या फोटोच्या कॅप्शनमुळं सोनम ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी तिचा क्लास घेतला आहे.

सोनमनं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला. तिचं अकाऊंट ट्विटरला लिंक असल्यानं हा फोटो ट्विटरलाही शेअर झाला. सोनमच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर सोनम ग्लॅमरस लुकमध्ये दिसत होती. एका चेअरवर बसेलली सोनम जमिनीच्या दिशेनं पहात होती. तिनं स्लीव्हलेस गाऊन घातला होता ज्यात ती खूप बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत होती.

फोटो शेअर करताना सोनमनं खास कॅप्शन दिलं होतं. सोनम म्हणाली की, “हे भगवान क्या करू?” सोनमच्या याच प्रश्नला उत्तर देत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

सोनमचा फोटो पाहून एकानं लिहिलं की, तिनं रामायण पाहायला हवं. देव तिला सद्बुद्धी देईल.

एका युजरनं लिहिलं की, सोनमजी तुमच्याकडे खूप पैसे आहेत. थोडा दान करा. खूप काही करू शकता तुम्ही.

https://twitter.com/ViraatKohli4/status/1260465812244254722?s=20

एका पाकिस्तानी युजरनं कमेंट केली, पाकिस्तानला या सोनम जी.

एकानं तर असंही म्हटलं की, तुम्ही राहुल गंधींचे व्हिडीओ पहा.