सोनम कपूरच्या ‘या’ नव्या अवतारानं ‘धमाल’ चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनम कपूरचा एक फोटो समोर आला आहे. यात तिने निळी नऊवारी नेसून देवीसारखा लुक केला आहे असे दिसत आहे. परंतु तिच्या एका हातात हेल्मेट आणि दुसऱ्या हातात क्रिकेटची बॅटही दिसत आहे. इतकेच नाही तर पायात स्पोर्ट शुजही आहे. क्रिकेट देवतेच्या अवतारातील सोनम कपूरचा फोटो पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले होते. सोनमचा हा लुक तिच्या आगामी सिनेमातील आहे. त्याचं हे पहिलं मोशन पोस्टर आहे जे गुरुवारी रिलीज झालं आहे.

द झोया फॅक्टर असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात सोनमसोबत प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्री दुलकर सलमानही मुख्य भूमिकेत असणार आहे. सोनमने तिच्या इंस्टावरून हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. हा फोटो शेअर करताना सोनम कॅप्शनमध्ये म्हणते की, “Who needs Nimbu Mirchi, when you have Zoya Solanki! India’s lucky charm is here to turn tables around for you.”

या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. याशिवाय या सिनेमात सोनमचा काका म्हणजेच संजय कपूर तिच्या वडिलांच्या भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात एका जाहिरात कंपनीत काम करणारी झोया भारतीय क्रिकेट टीमची लकी मॅस्कॉट कशी होती याची कथा दाखवण्यात आली आहे. अंगद बेदीही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अनुजा चौहान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like