सोनम कपूरला मेसेजमध्ये मिळतायेत ‘शिव्या’, सोशलवर शेअर केले ScreenShots !

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. यानंतर अनेक स्टार किड्स लोकांच्या निशाण्यावर आले. अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूर ही देखील याची शिकार झाली. तिला अनेकांनी अपशब्द वापरत मेसेज केले. यावर नुकतंच तिनं खुलून भाष्य केलं होतं. फिल्म स्टारची मुलगी असणं अभिमानाची गोष्ट असून तिच्या ओळखीवर तिला गर्व आहे असं ती म्हणाली आहे. सोनमनं काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत ज्यात तिला अपशब्द वापरले गेल्याचं दिसत आहे.

सोनमनं शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये दिसत आहे की, वडिल अनिल कपूर आणि बहिण रिया कपूरबद्दल अपशब्दांचा वापर झाला आहे. सोनम ट्विट करत म्हणाली की, “माझ्यावर करण्यात आलेल्या या काही कमेंट्स आहेत. सर्व मीडिया आणि ज्या लोकांना यांना उचकवलं आहे ते यासाठी जबाबदार आहे. जे लोक सांगत आहेत की, इतरांनी चांगलं वागा तेच लोक आता इतरांहून वाईट वागत आहेत. माझी टीम अशा कमेंटचा अधिकाऱ्यांकडे रिपोर्ट करत आहे. मला गर्व आहे की, मी एका फिल्म स्टारची मुलगी आहे. माझ्या वडिलांनी यासाठी खूप मेहनतही घेतली आहे.”

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग, खूबसुरत, पॅड मॅन, संजू, प्रेम रतन धन पायो, नीरजा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.