RSS प्रमुख मोहन भागवतांच्या घटस्फोटाच्या विधानावर ‘भडकली’ सोनम कपूर, म्हणाली – ‘मुर्खतापूर्ण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी घटस्फोटावर वक्तव्य केल्यानं सध्या ते चर्चेत आहेत. शिकलेल्या लोकांमध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशात आता बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनंही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोनम कपूरनं ट्विट करत मोहन भागवत यांना टारगेट केलं आहे. सोनम म्हणाली, “कोणता समजूतदार माणूस असं विधान करतो? हे एक मागास आणि मुर्खतापूर्ण विधान आहे.” सोनमच्या या ट्विटनंतर अनेकांची प्रतिक्रिया येताना दिसत आहे. कोणी सोनमला चुकीचं म्हणत आहे आणि मोहन भागवत यांना बरोबर म्हणत आहे. मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं दिसत आहे.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अनिल कपूर, राजकुमार राव हे देखील दिसले होते. हा सिनेमा खास काही चालला नाही.

मूर्खतापूर्ण

काय म्हणाले होते मोहन भागवत ?

मोहन भागवत म्हणाले होते, “सध्या समाजात घटस्फोटाची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. संपन्न आणि शिकलेल्या कुटुंबातून घटस्फोटाची प्रकरणं जास्त समोर येतात. कारण आणि शिक्षण संपन्नता यामुळे माणसात ऑरोगंस येतो. याचा परिणाम म्हणजे कुटुंब वेगळं होतं. कुटुंब तुटताना दिसतात. भारतात हिंदू समाजाला काहीच पर्याय नाही.”