‘सिंगर’ कनिका कपूरच्या सपोर्टसाठी पुढे आली अभिनेत्री सोनम कपूर ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड मधील प्रसिद्ध सिंगर कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाली असून सध्या ती रुग्णलयात असून डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. लंडनला असणारी कनिका अलीकडेच लखनऊला परतली आहे. लखनऊच्या घरी तिनं होळीही साजरी केली होती. कनिकाविरोधात प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूर कनिकाच्या सपोर्टसाठी पुढे आली आहे.

सोनम कपूरनं सोशलवर ट्विट केलं आहे. सोनम कपूर म्हणते, “मित्रांनो कनिका 9 मार्च 2020 भारतात आली आहे. तेव्हापासून भारतातील लोक वेगळे राहत नव्हते(आयसोलेशनमध्ये नव्हते). तेव्हा पूर्ण देश होळी खेळत होता.”

सोनम कपूर यानंतर आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. एकानं कमेंट केली आहे की, तू बचाव करण्यासाठी चुकीच्या माणसाची निवड केली आहे. एकानं लिहिलं की, यावर्षी होळी खेळलीच नाहीये. एकानं म्हटलं की, प्रत्येकजण परदेशातून नव्हता आला. इतरही अनेक युजर्नसं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोनम कपूरनं कनिकाच्या सपोर्टमध्ये केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी सोशल मीडियावर या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.