Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये लंडनला पोहोचली सोनम कपूर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसमुळं देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, लॉकडाऊनच्या काळात आता बॉलिवूड स्टार सोनम कपूर लंडनला पोहोचली आहे.

मार्चमध्ये जेव्हा देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती तेव्हा सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत दिल्लीला गेली होती. यानंतर 9 जून रोजी ती तिच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच पतीसोबत मुंबईला आली होती. यांतर ती पतीसोबत मुंबईतच रहात होती. परंतु आता ती लंडनला पोहोचली आहे. खुद्द सोनमनंच यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोनमनं तिच्या इंस्टा स्टोरीला काही फोटो शेअरह केले आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये सोनमनं लिहिलं की, “London, I’am Back… So Beautiful.” सोनमच्या स्टोरीवरील हे फोटो सध्या खूप चर्चेत आहेत.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग, खूबसुरत, पॅड मॅन, संजू, प्रेम रतन धन पायो, नीरजा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like