अभिनेत्री सोनम कपूर ड्रेसमुळे प्रचंड ‘ट्रोल’, लोक म्हणाले- ‘वडिलांसमोर असे कपडे घालतात का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी, आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर स्टारर मलंग सिनेमाच्या स्क्रिनिंगचं नुकतच आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगदरम्यान बॉलिवूडमधील मोठे स्टार्स आले होते. अभिनेत्री सोनम कपूर देखील आपल्या वडिलांसोबत आली होती. स्क्रिनिंगदरम्यान सोनम ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. यावेळी तिनं अनिल कपूरसोबत मीडियाला पोजही दिल्या. पंरतु आपल्या ड्रेसमुळे सोनम कपूर ट्रोल झाली.

ट्रोलर्सनं सोनमवर निशाणा साधताना म्हटलं की, “आपल्या वडिलांसमोर कोणी असे ड्रेस घालून कसं येऊ शकतं. ह्यांना लाज नाही का वाटत?”

एकानं तिला ट्रोल करत म्हटलं की, असे कपडे घालून आपल्या वडिलांसोबत उभं राहणं किती विचित्र वाटत असेल.

https://www.instagram.com/p/B8Qc676hUHW/

आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, काहीतरी लाज ठेव.

जरी ट्रोलर्सनी सोनम ट्रोल केलं असलं तरी काहींनी तिचं कौतुकही केलं. आहे. सोनमची स्तुती करत एकानं म्हटलं की, सोनम सुंदर दिसत आहे. आणखी एकानं लिहिलं की, बापलेकीची कूलेस्ट जोडी. अल्टीमेट फॅशन क्वीन ऑफ बॉलिवूड.

सोनम कपूर याआधीही आपल्या ड्रेसमुळे ट्रेल झाली आहे. तिचा फॅशन सेंस मात्र चाहत्यांना नेहमीच आवडत असतो.