थ्री इडियट्सचे रिअल लाईफ ‘रॅन्चो’ Sonam Wangchuk यांनी शेअर केला नवीन Video, करत आहेत ‘हे’ काम…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमीर खानची सुपरहिट फिल्म ‘थ्री इडियट्स’ चे रिअल लाईफ ‘रैचो’ सोनम वांगचुक नेहमी असे अविष्कार करतात, ज्यामुळे संपूर्ण देशाला त्यांच्यावर गर्व वाटेल. गेल्या काही दिवसात मायनस टेंपरेचरमध्ये गरमी देणारे टेंट बनवून चर्चेत असलेले सोनम वांगचुक यांनी केलेल्या नवीन कामावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बनवत आहेत बर्फाचा बोगदा
सद्या, सोनम वांगचुक बर्फात बोगदा तयार करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ते सद्या श्रीनगर-लेह हायवेवर काम करत आहेत. हायवेवर प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी बर्फाचा बोगदा बवण्याच्या प्रकल्पावर ते काम करत आहेत. युट्युबवर यासंबधी संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. पहा हा व्हिडीओ…

पैशाची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण
सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी जम्मू आणि कश्मीरमध्ये असलेल्या जोजिला टॉपवर स्वतः जाऊन तेथील स्थितीबद्धल आढावा घेतला आहे. व्हिडीओमध्ये सोनम यांनी सांगितले की, जोजिला बोगदा झाल्यानंतर लोकांना दिलासा मिळेल. त्यांनी हे हि सांगितले की, हा बोगदा पर्यावरणीय आणि आर्थिक बाबतीत वरदान ठरेल, कारण यामुळे पाच टन कार्बन डायऑकसाईड आणि करोडो रुपयांची बचत होईल.

‘ही’ संकटे समोर येऊ शकतात…
या बोगद्याबाबत सोनम वांगचुक म्हणाले, या प्रकल्पावर काम करताना अनेक धोके येऊ शकतात, कारण आजूबाजूच्या रस्त्यावर बर्फाच्छादित वादळ आणि हिमस्खलन होण्याचा धोका कायम राहील.

सोलर हिटेड मिलिट्री टेंटची केली प्रशंसा
गेल्या काही दिवसात सोनमने देशाची सेवा करणाऱ्या जवानांसाठी एक असा टेंट बनवला ज्यामुळे बर्फाळ प्रदेशात थंडीच्या दिवसात मदत होईल. त्यांनी सोलर हिटेड मिलिट्री टेंटची सौगत सेनाला दिली आहे. ज्याचा वापर सैनिक सियाचीन आणि गलवान घाटी सारख्या थंड ठिकाणी करू शकतील. या टेंटचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा ३५ डिग्रीपर्यंत कमी राहते. या टेंटचे वजन फक्त ३० किलोग्रॅम आहे, एकावेळी यात १० सैनिक राहू शकतात.