काय सांगता ! होय, सोनभद्रमध्ये रेल्वेपेक्षाही लांब 300 टन सोन्याचा ‘दगड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याचा साठा सापडल्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. सोनभद्रच्या मातीच्या खाली जवळपास तीन हजार टनांहून अधिक साठा मिळाला आहे. एवढेच नाही तर आश्चर्याची बाब म्हणजे सोनभद्रच्या खाली दफन केलेल्या सोन्याच्या खडकाचा आकार हा एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब असून 18 मीटर खोल आहे. हे सोन्याचे खडक 15.15 मीटर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सोनभद्रच्या हरदी भागातील दोन टेकड्यांमध्ये सोन, धातू आणि युरेनियम या धातूंचा मोठा साठा असल्याचे प्रशासनाच्या अहवालात निश्चित झाले होते. सोनभद्रमध्ये असलेले सोने जवळपास दोन रेल्वेच्या बरोबर असल्याचे समजते. दरम्यान, सोनभद्रतून मिळालेल्या सोन्यामुळे भारताजवळील सोन्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासह, अस्तित्त्वात असलेल्या सोन्याच्या स्टॉकच्या उपलब्धतेसह दुसर्‍या क्रमांकावर येणार असल्याचे म्हंटले जात आहे. सध्या सोन्याच्या साठ्यात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 8,133.5 टन सोन्याचे साठा आहे. त्याच बरोबर, जर्मनी 3,366 टन आणि तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे 2,814 टन सोने आहे. त्यानंतर इटली, फ्रान्स आणि रशियाचा क्रमांक लागतो.

सोनभद्रच्या टेकड्यांमध्ये सोन्याचा शोध घेणारे डॉक्टर मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले की, जमिनीखालून जवळच सोन्याचा साठा आहे ज्याला दोन भागात विभागले आहे. असे म्हटले जाते की भारतात ब्रिटीशांच्या राजवटीतही या सोन्याच्या साठ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. हा खजिना शोधण्यासाठी भारताला 40 वर्षे लागली. बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की इंग्रजांच्या काळात टेकड्यांमध्ये सोन्याचा शोध लागल्यामुळे त्या टेकडीचे नाव ‘सोन पहाडी’ असे ठेवले गेले. येथील आदिवासी म्हणतात की, इतके सोने या टेकड्यांच्या खाली असेल. याची आम्हाला कल्पना नव्हती.

बर्‍याच वर्षांनंतर 2005 मध्ये सोन्याची खाणी शोधण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. त्यावेळीसुद्धा, प्रारंभिक तपासणीत धातूच्या संभाव्यतेचा अंदाज वर्तविला गेला होता, परंतु त्या धातूचा प्रकार व प्रमाण याचा अंदाज आला नाही. त्यांनतर सोनभद्र येथील हरदी येथे जमिनीखाली सोने असल्याची पुष्टी केल्यानंतर सरकारने यावर काम करण्यास सुरुवात केली. ई – निविदाद्वारे ब्लॉक्सचा लिलाव करण्यासाठी सरकारने सात सदस्यांची एक टीम तयार केली असून त्या भागाचे टॅगिंग केले जाईल.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय), जिल्हा प्रशासन आणि खनिज विभाग सोनभद्रच्या भागाची तपासणी करत आहेत. यासह, विद्युत, चुंबकीय आणि स्पेक्ट्रोमीटर उपकरणांचा वापर करून तपास केला जात आहे. मिळालेल्या ताज्या अहवालात, हरदी प्रदेशात 646.15 किलो सोन्याचा साठा असल्याचे निश्‍चित झाले आहे. तर सोन टेकडीच्या 2943.25 टन सोन्याचा साथ असल्याचे समजते. सोन्याशिवाय युरेनियम व इतर धातूंचा साठादेखील असल्याचे म्हंटले जात आहे.