सोनभद्रमध्ये ‘जिथं’ सापडला सोन्याचा ‘खजाना’, परिसरातील 269 गावातील 10,000 लोकांचं जीवन झालं ‘बर्बाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश मधील सोनभद्र जिल्हा कथित सोन्याच्या साठ्यामुळे एका आठवड्यापासून खूप चर्चेत आहे, परंतु तेथे वायू आणि जल प्रदूषणामुळे २६९ गावातील जवळपास १०,००० गावकरी हे फ्लोरोसिसमुळे अपंग झाले आहेत.

६० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या सोनभद्र जिल्ह्यातील २६९ गावात सुमारे दहा हजार लोक निकृष्ट हवा व फ्लोराईडयुक्त पाणी पिऊन फ्लोरोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत.

सोनभद्र में जहां मिला सोने का खजाना, वहां बीमारी से 10000 लोगों की जिंदगी बर्बाद

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) हस्तक्षेप करूनही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कोणतीही प्रभावी पावले उचलू शकलेले नाही.

चोपन विकास खंडाच्या पडरच ग्रामपंचायतीच्या नवीन वस्तीतील रामधनी शर्मा (५५), विंध्याचल शर्मा (५८), सलील पटेल (१८), गुड्डू (१५), शीला (२०), चिल्का डाड गावाचे सुनील गुप्ता (३५) उषा (१६) अशी काही अपंग व्यक्तींची नावे आहेत.

या व्यतिरिक्त या जिल्ह्यात कचनवा, पिरहवा, मनबसा, कठौली, मझौली, झारो, म्योरपुर, गोविंदपूर, कुशमाहा, रास, पहरी, चेतवा, जरहा अशी २६९ गावे आहेत, जिथे कमी दर्जाची हवा व फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने जवळपास १० हजार व्यक्ती अपंग झाले किंवा अपंग होण्याच्या मार्गावर आहेत.

‘वनवासी सेवा आश्रम’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित पर्यावरणीय कार्यकर्ते जगत नारायण विश्वकर्मा म्हणतात, ‘सेंटर फॉर सायन्स, नवी दिल्ली च्या एका टीमने २०१२ मध्ये इथे येऊन लोकांचे रक्त, नखं आणि केसांची तपासणी केली होती. त्यामध्ये पारा ची मात्रा जास्त आढळून आली होती आणि फ्लूरोसिस नावाचा आजार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.’

विश्वकर्मा यांनी सांगितले की, ‘वर्ष २०१८च्या नोव्हेंबर महिन्यात आरोग्य महासंचालकांच्या पुढाकाराने एक शिबीर लावण्यात आले होते. ज्यात येथील व्यक्तींच्या लघवी तपासणीच्या दरम्यान फ्लोराईड एक मिलिग्रॅम प्रति लिटरच्या ऐवजी १२ मिलिग्रॅम प्रति लिटर आढळून आले होते. जे की ११ मिलिग्रॅम जास्त होते.

विश्वकर्मा यांनी असे देखील सांगितले की, ‘वायूची खराब गुणवत्ता आणि पाण्यातील फ्लोराईडची तक्रार एनजीटीमध्ये दाखल करण्यात आली होती, परंतु प्रशासन एनजीटीच्या सूचनांचे पालन करीत नाही.

सर्वोच्च न्यायालयात आदिवासींच्या हक्कासाठी लढा देणारे अ‍ॅडव्होकेट अश्विनी दुबे यांचे म्हणणे आहे की, ‘राज्य सरकार येथील खनिज व वन संपत्तीचा गैरफायदा घेऊन महसूल वसूल करत आहे आणि माफिया कायदेशीर व बेकायदेशीरपणे खनन करतात, परंतु आदिवासींना आजही नाल्याचे घाणेरडे पाणी पिण्यास भाग पाडले जाते.’

सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) म्योरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.फिरोज आंबेदिन यांनी रविवारी आयएएनएसला सांगितले की, ‘हा भाग फ्लोराईड बाधित आहे, आम्ही पीडित लोकांना कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याचा सल्ला देतो. यामुळे शुद्ध पाणी आणि आवळा घेतल्यास दिलासा मिळतो. अद्याप तरी त्याचा उपचार सापडलेला नाही.’