सांगलीत ‘वास्तुविशारद’च्या मुलाची आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – विश्रामबाग येथील हरमोनी रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन वास्तुविशारद च्या मुलाने आत्महत्या केली. वरुण रवींद्र पटवर्धन (वय २९) असे त्याचे नाव आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. वास्तुविशारद रवींद्र पटवर्धन यांचा तो मुलगा आहे.

वरुण विश्रामबाग येथील हनुमान रेस्टॉरंटजवळील हरमोनी रेसिडेन्सी येथे कुटुंबासह राहत होता. नैराश्‍यातून त्याने आज दुपारी एकच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. चाळीस फुटांवरून पडल्याने त्याच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली होती. तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तो मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

..अन्यथा ‘कंडीशनर’चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय

शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्याचा असा करावा उपयोग

पहलू खान लिंचिंग प्रकरण : कॉंग्रेस आता भाजपची कॉपी बनले आहे : ओवेसी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार