शाहरुखने केले सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपरस्टार शाहरुखने सोशल मीडियावर ‘बदला’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या ‘पिंक’ या चित्रपटानंतर आता ते ‘बदला’ हा नवीन चित्रपट घेवून येत आहेत. हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिली प्रोडक्शनद्वारे निर्मीत केला आहे.

शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ‘बदला’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा लुक दिसत आहे.

शाहरुखने आपल्या ट्विटमधील पोस्टरसोबत शाहरुखने म्हटले आहे की, “आता वातावरण बदलल्यासारखे दिसते आहे, हा सिनेमाचा पहिला लुक आहे, त्यात तपस्या पन्नू आणि सीनियर बच्चन यांचा समावेश आहे, यानंतर पोस्टरवर लिहले आहे की, “क्षमा करणे नेहमीच बरोबर नसते”. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. ‘बदला’ या चित्रपट मार्च २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. तर आज (१२ फेब्रुवारी) मंगळवारी चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाले आहे.

या चित्रपटाची कथा खूनाच्या रहस्यावर आधारीत आहे. या चित्रपटाशिवाय अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’ मध्ये तापी पन्नूदेखील दिसणार आहे. तर अमिताभ बच्चन हे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मस्त्रा’ या चित्रपटात  दिसणार आहेत. https://twitter.com/iamsrk/status/1094858368869646336